Manasvi Choudhary
'बनाना बन्स' कर्नाटकातील उडुपी आणि मंगळुरू भागातील लोकप्रिय पदार्थ आहे. पिकलेल्या केळीपासून तयार होणारा हा पदार्थ दिसायला मऊ, लुसलुशीत आणि चवीला गोड असतो.
बनाना बन्स बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने ही चवदार रेसिपी ट्राय करू शकता.
बनाना बन्स बनवण्यासाठी केळी, मैदा किंवा गव्हाचे पीठ, साखर, दही, जिरे, आणि सोडा हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी एका भांड्यात पिकलेली केळी आणि साखर एकत्र मिक्स करा नंतर त्यात मैदा मिक्स करा.
संपूर्ण मिश्रण चांगले एकत्र केल्यानंतर त्यात साखर, दही, जिरे हे मिक्स करा.
पीठ चांगले मळून ३ ते ४ तास आंबवण्यासाठी ठेवा. त्यानंतर आंबवलेल्या पिठाचे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये तयार पुऱ्या दोन्ही बाजूंनी चांगल्या कुरकुरीत अश्या तळून घ्या.
अशाप्रकारे घरच्या घरी बनाना बिन्स ही रेसिपी तयार आहे.