Shreya Maskar
तेलामधील पोषक घटक केस मजबूत ठेवण्यास मदत करतात. तसेच पावसाळ्यात टाळूच्या विविध संसर्गांशी लढण्यासही मदत करतात.
पावसाळ्यात तुमच्या केसांच्या मुळांपर्यंत रक्तप्रवाह वाढवण्यासाठी आणि केस गळणे टाळण्यासाठी तुम्ही आठवड्यातून किमान दोनदा कोमट तेलाने मालिश केली पाहिजे.
पावसाच्या पाण्याने केस जास्त ओले झाल्यास ते धुवा. केसांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यातील आम्लतेमुळे टाळूचा पीएच (pH) असंतुलित होऊ शकतो, ज्यामुळे केसांच्या समस्या निर्माण होतात.
केस धुवण्यासाठी चांगला dandruff फ्री शॅम्पू वापरा. कंडिशनर वापरल्याने टाळूच्या ग्रंथींना अतिरिक्त सेबम तयार करण्यापासून प्रतिबंध होतो, ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतात.
पावसामुळे केस वारंवार भिजतात, त्यामुळे आपण ते कोरडे करायला दुर्लक्ष किंवा कंटाळा करतो. मात्र वेळोवेळी केस,टाळू कोरडे करणे गरजेचे आहे. केस धुतल्यानंतर केस गळणे कमी करण्यासाठी तुमची टाळू त्वरित कोरडी करा.
केस नैसर्गिकरित्या हवेत सुकू द्या आणि ओले असताना ते बांधणे टाळा. पावसाळ्यात बाहेर जाताना केस झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा स्कार्फ यांसारख्या आवश्यक वस्तूंचा वापर करा.
पावसाळ्यात केस विंचरताना केस सहजपणे वेगळे करण्यासाठी रुंद दातांचा कंगवा निवडा. केस तुटणे टाळण्यासाठी कंगव्याच्या दातांमध्ये पुरेशी जागा असल्याची खात्री करा. ओले केस लगेच विंचरणे टाळा, कारण यामुळे केस तुटण्याचा धोका वाढतो.
पावसाळ्यात केस गळती थांबवण्यासाठी आणि केसांची चमक चांगली ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा डीप कंडिशनर लावा. तुम्ही कंडिशनर संपूर्ण केसांना लावून १५ मिनिटांसाठी गरम टॉवेलमध्ये गुंडाळा. उष्णतेमुळे कंडिशनर केसांच्या मुळांपर्यंत खोलवर जाण्यास मदत होईल आणि पावसाळ्यात केस जास्त कोरडे होण्यापासून वाचतील.