Manasvi Choudhary
पावसाला सुरूवात होताच आरोग्यासह त्वचेची काळजी घ्यावी लागते. वातावरणातील बदलामुळे त्वचेवर परिणाम होतो.
त्वचा तेलकट होणे, पिंपल्स होणे, त्वचा कोरडी होणे आणि फंगल इन्फेक्शन या समस्या पावसाळ्यात उद्भवतात. मात्र तुम्ही काही सोप्या टिप्स नियमितपणे फॉलो केल्यास त्वचा मऊ, चमकदार राहील.
पावसाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त पाणी प्या. शरीरात पाण्याची कमरता असल्याने त्वचा हायड्रेट होऊन कोरडी होते.
दमट वातावरणामुळे त्वचेची छिद्रे बंद होऊन पिंपल्स येतात यामुळे दिवसातून दोन वेळा फेसवॉश करा.
अनेकजण पावसाळ्यात सनस्क्रिन लावत नाही. मात्र असे करू नका पावसाळ्यात देखील तुम्ही सनस्क्रिन लावणे महत्वाचे आहे.
पावसाळ्यात वातावरण थंड असते यामुळे तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करता मात्र अतिगरम पाणी वापरू नका.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा स्क्रब केल्याने त्वचेवरील मृत पेशी कमी होतात आणि त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करण्यास मदत करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.