Manasvi Choudhary
पावसाळ्यात भिजण्याची जितकी मज्जा वाटते, तेवढचं आरोग्य देखील जपणं महत्वाचं आहे.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचते यामुळे प्रवास नकोसा वाटतो.
पावसाळ्यात पायांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.
पावसाळ्यात पायातील शूज किंवा चप्पल ओले होतात यामुळे पायांना संसर्ग तसेच खाज सुटण्याची समस्या उद्भवते.
पावसाळ्यात रस्ते तुडुंब भरलेले असतात अशावेळेस कामानिमित्त घराबाहेर पडा.
पाय स्वच्छ करा पावसाळ्याच्या दिवसात बाहेरून घरी आल्यानंतर सर्वप्रथम पाय कोरडे करा.
पावसात बाहेर गेल्यानंतर चप्पल न घालता चालणे टाळा.
बाहेरून आल्यानंतर पाय गरम पाण्याने स्वच्छ करा आणि चांगले कोरडे करून घ्या.
पायांना चांगल्या दर्जाची फूट क्रीम किंवा पायांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायजर लावा.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.