Shreya Maskar
पावसाळा म्हटले की चटपटीत खाणे आले. आपण पावसाळ्यात मक्याचे अनेक चटपटीत पदार्थ बनवतो. यात कॉर्न चाट, कॉर्न पकोडे, मक्याची भाजी, पेरी-पेरी कॉर्न, कॉर्न सूप अशा अनेक पदार्थांचा समावेश असतो.
पावसाळ्यात रात्रीच्या जेवणाला फक्त १० मिनिटांत बनणारी कॉर्न करी बनवा. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आणि खायला अधिक रुचकर आहे.
कॉर्न करी बनवण्यासाठी उकडलेले- स्वीट कॉर्न (मका), काजू, तेल, मीठ, आले-लसूण पेस्ट , गरम मसाला, कसुरी मेथी, क्रीम , जिरे, लाल मिरची पूड, धणे पूड, हळद, कोथिंबीर, तमालपत्र, टोमॅटो, कांदा, दूध इत्यादी साहित्य लागते.
कॉर्न करी बनवण्यासाठी सर्वप्रथम मका कुकरमध्ये उकडून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल, तमालपत्र, बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्या.
त्यानंतर मिश्रणात आले-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ घालून चांगले मिक्स करा.
त्यानंतर करीमध्ये गरम मसाला, कसुरी मेथी, जिरे, लाल मिरची पूड, धणे पूड, हळद टाकून तेल सुटेपर्यंत मसाले शिजवून घ्या.
पुढे मिश्रणात काजू पेस्ट, दूध आणि क्रीम घालून, एक उकळी काढून घ्या. करीला चांगली उकळी आल्यावर त्यात उकडलेले मक्याचे दाणे मिक्स करा.
शेवटी हिरवीगार कोथिंबीर घालून ५ मिनिटे करी शिजू द्या. त्यानंतर गरमागरम सर्व्ह करा.