Manasvi Choudhary
पावसाळा हा अनेकांना आवडतो मात्र पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. फ्लू, ताप आणि पोटाचे विकार पावसाळ्यात या आजारांचा धोका अधिक असतो
पावसाळ्यात आहारात काही पदार्थ खाल्ल्याने अन्न विषबाधा होऊ शकतो. यासाठी आहारात कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
पालक, मेथी या हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी चांगल्या असल्या, तरी पावसाळ्यात त्यात कीटक आणि जंतू असण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच या भाज्या धुवून आणि चांगल्या शिजवूनच खा
मोड आलेले कडधान्य शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. मात्र, पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे त्यात बॅक्टेरिया वेगाने वाढतात. म्हणून या दिवसांत कच्चे स्प्राउट्स खाण्याऐवजी ते वाफवून किंवा शिजवून खा
पावसाळा हा माशांचा प्रजननाचा काळ असतो. तसेच या दिवसांत पाणी दूषित झाल्यामुळे मासे खाणे टाळावे.
पावसाळ्यात हवेतील ओलाव्यामुळे अन्नामध्ये बुरशी आणि जिवाणू लगेच तयार होतात. त्यामुळे उघड्यावरचे, रस्त्यावरील तेलकट पदार्थ किंवा शिळे अन्न खाणे पूर्णपणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या..