पावसाळ्यात ऑफिसला जाताना 'या' फॅशन टिप्स करा फॉलो, दिवसभर दिसाल फ्रेश

Manasvi Choudhary

मान्सून फॅशन स्टाईल

पावसाळा सुरू झाला की 'ऑफिसला जाताना नक्की काय घालावं?' असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. कारण पावसाळ्यात कपडे ओले होताता. ओले कपडे ऑफिसमध्ये वाळत नाहीत त्यामुळे चिडचिड होते.

Monsoon Fashion Tips

अशी करा स्टाईल

पावसाळ्यात तुम्हालाही स्टायलिश आणि कूल दिसायचे असेल तर त्यासाठी तुमच्या वॉर्डरोबमध्ये कोणते कपडे असावेत आणि कशी स्टाईल करावी? याच्या काही सोप्या टिप्स या वेबस्टोरीतून जाणून घ्या

Monsoon Fashion Tips

योग्य फॅब्रिकची निवड

पावसाळ्यात कपड्यांचे फॅब्रिक निवडताना विशेष काळजी घ्या. पावसाळ्यात जाड कपडे किंवा जड डेनिम जीन्स घालणे टाळा. हे कपडे ओले झाले की लवकर सुकत नाहीत आणि वजनाने जड होतात.

Monsoon Fashion Tips

कोणते कपडे परिधान करावे

पावसाळ्यात तुम्ही रेयॉन, पॉलिस्टर, जॉर्जेट , आणि नायलॉन या फॅब्रिकचे कपडे पावसाळ्यात परिधान करा. वजनाला हलके असल्याने यात तुम्हाला दिवसभर कम्फर्टेबल वाटेल.

Monsoon Fashion Tips | Google

रंगाची निवड योग्य

पावसाळ्यात रंगांची निवड खूप महत्त्वाची आहे. या दिवसांत पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे घालणे टाळा. फिकट रंगाचे कपडे ओले झाल्यावर त्यावर चिखलाचे उडणारे डाग लगेच दिसतात. यामुळे तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटू शकते.

Monsoon Fashion Tips

स्टायलिश लूक

ऑफिसमध्ये किंवा प्रवासात कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही हलक्या कॉटन किंवा रेयॉनचे गाऊन्स किंवा मॅक्सी ड्रेसेसची निवड करू शकता. हे दिसायला अत्यंत स्टायलिश वाटतात.

Monsoon Fashion Tips

मॉडर्न लूक

ऑफिसमध्ये फॉर्मल आणि मॉर्डन लूक हवा असेल, तर स्कर्ट-टॉप तुम्ही परिधान करू शकता. अनेक स्टायलिश डिझाईन्स यामध्ये आहेत.

Monsoon Fashion Tips

NEXT: तेलाचा १ थेंबही न टाकता बनवा कुरकुरीत भजी, एकदा ही रेसिपी करून बघाच!

Oil Free Pakoda Recipe
येथे क्लिक करा...