Shreya Maskar
पावसाचे पाणी आरोग्यासाठी घातक ठरते. यात हवेतील प्रदूषके, धूळ आणि सूक्ष्मजीव मिसळतात. जेव्हा हे पाणी डोळ्यांत उडते, तेव्हा जळजळ आणि विविध प्रकारचे संसर्ग होऊ शकतात.
डोळ्यांच्याकडेला सूज येते. हे विषाणू, जीवाणू किंवा ॲलर्जीमुळे होऊ शकते. पावसाच्या पाण्यात जंतू असू शकतात आणि दमट हवेमुळे ते वेगाने पसरतात. याची लक्षणे म्हणजे डोळे लाल होणे, तीव्र खाज सुटणे आणि डोळ्यांतून पाणी येणे.
फंगल केराटाइटिसमध्ये कॉर्नियाला (डोळ्याचा पारदर्शक पुढचा भाग) बुरशीजन्य संसर्ग होतो. जर दूषित पावसाचे पाणी डोळ्यांत गेले तर कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांसाठी हे धोकदायक ठरते. यामुळे तीव्र वेदना, प्रकाशाचा त्रास आणि अंधुक दिसणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
ओलावा असलेल्या वातावरणात वाढणाऱ्या जीवाणू, विषाणू यामुळे कॉर्नियल अल्सर होतो. पावसाच्या पाण्यामुळे कॉर्नियाला जखमा होऊ शकतात. ज्यामुळे डोळे लाल होणे आणि तीव्र वेदना होणे यांसारखे त्रास होतात.
रांजणवाडीमध्ये पापणीवर लाल गाठ येते, जी एखाद्या मुरुमासारखी दिसते. पापण्यांजवळील तेलाच्या ग्रंथींना जीवाणूंचा संसर्ग झाल्यामुळे असे होते. पावसाचे पाणी किंवा प्रदूषित वाऱ्यामुळे हे जीवाणू तिथे पोहचतात.
पावसाळ्यातील दमट हवामानामुळे हवेत बुरशी आणि डस्ट माइट्स पसरतात. हे घटक जेव्हा डोळ्यांच्या संपर्कात येतात तेव्हा डोळ्यांना तीव्र खाज सुटणे, डोळे लाल होणे आणि डोळ्यांत काहीतरी टोचल्यासारखे वाटणे असे त्रास सुरू होतात.
पावसाळ्यात डोळ्यांच्या संरक्षणासाठी चष्मा/गॉगल्स वापरा. जर पावसाचे पाणी डोळ्यांत उडाले तर स्वच्छ, उकळून थंड केलेल्या पाण्याने डोळे धुवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.