Shreya Maskar
मधुमेहाच्या रुग्णांना पावसाळ्यात पायांच्या संसर्गाचा धोका असतो. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे, साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करा. पावसाच्या पाण्यात भिजणे टाळा आणि पाय कायम कोरडे ठेवा.
मधुमेहाच्या रुग्णांना यीस्ट इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) होऊ शकते. त्यामुळे, वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. शरीराच्या ओलाव्यामुळे हा संसर्ग अधिक वाढतो. संसर्ग वाढल्यास जखमा देखील होऊ शकतात आणि डायबिटीज रुग्णांच्या जखमा लवकर बऱ्या होत नाही.
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे या संसर्ग होण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे लघवी करताना जळजळ होते. वेदना होतात आणि सूज देखील येते.
पावसाळ्यात तुम्हाला सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात डोळ्यांच्या संसर्गाचा धोकाही वाढतो.
पावसाळ्यात मधुमेहींना घशाच्या संसर्गाचा धोका असतो. कारण रक्तातील वाढलेली साखर शरीराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम करते, ज्यामुळे जिवाणू आणि विषाणूंना वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि शरीराला त्यांचा सामना करणे कठीण जाते.त्यामुळे गाळलेले किंवा उकळलेले पाणी प्यावे.
दूषित पाणी आणि अन्नामुळे विषबाधा, अतिसार आणि टायफॉइड हे आजार होतात. उलट्या आणि अतिसारामुळे तीव्र निर्जलीकरण होऊ शकते आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक आहे.
स्वच्छता राखा, शरीरातील पाण्याची कमतरता टाळा, शरीर कोरडे ठेवा, हेल्दी पदार्थांचे सेवन करा, सैल-सुती कपडे घाला आणि वेळेवर औषधे घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.