ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात गाडी चालवताना गाडीच्या काचांवर धुके साचते, सतत पावसाचे पाणी पडते. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात गाडीची विंडशील्ड, साईड मिरर वॉटरप्रुफ असतील तर त्यावर धुके किंवा पाणी साचत नाही. पुढील काही हॅक्स वापरून तुम्ही तुमच्या गाडीच्या काचा वाटरप्रूफ बनवू शकता.
गाडिच्या विंडशील्डवर आणि खिडकीच्या काचेवर पावसाचे पाणी साचून राहू नये. यासाठी काचांवर हायड्रोफोबिक स्प्रे लावा. यामुळे काचांवर पाणी थांबत नाही.
गाडीच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या आरशांचा वापर मागून येणाऱ्या गाड्या पाहण्यायाठी होतो. यांवर धुके साचले असेल तर, अर्धा कापलेला बटाटा आरशांच्या काचेवर घासा. यामुळे धुके कमी साचते.
एका स्प्रे बाटलीत थोडा व्हिनेगर व पाण्याचे मिश्रण भरून ठेवा आणि गाडीच्या काचांवर स्प्रे करा. याने धुकं साचणंही कमी होतं आणि लवकर धूळही साचत नाही.
पावसाचे पाणी आणि धुके साचू नये यासाठी गाडीच्या काचांवर व्हेसलिन लावा आणि नंतर एका सुती कपड्याने काच पुसून घ्या.
व्हेसलिनप्रमाणे टूथपेस्ट आणि शेविंग फोमचा वापर करूनही गाडीच्या काचा वाटरप्रूफ बनवता येतात.
मोबाईलच्या स्क्रीनवर वापरला जाणारा अँटीफॉग स्प्रे गाडीच्या विंडशील्डच्या आतल्या बाजूला स्प्रे करा. यामुळे काचांवर धुके साचत नाही.
पावसाळ्यात गाडीमध्ये थंडावा राहतो. यामुळे हवा ओली होऊन धुके साचते. यावर उपाय म्हणून तुमच्या गाडीत सिलीका जेलची पाकिटं ठेवा.