ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हाला देखील कुठेही लांब न जाता पावसाचा आनंद घ्यायचा असेल. तर वसई-विरार मधील 'ही' ८ ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा.
वसई येथे तुंगारेश्वर मंदिर आहे. हे शंकराचं मंदिर आहे. हे मंदिर तुंगारेश्वर प्रवेशद्वारापासून २-३ किमी अंतरावर आहे. पावसात तेथील आजूबाजूचा परिसर हिरवागार आणि डोळ्यांत साठवून घेण्यासारखा असतो.
निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग असलेले ठिकाण म्हणजे चिंचोटी धबधबा. धबधब्यासह वसईतील या ठिकाणी हिरवंगार जंगल आणि पायवाटा देखील पहायला मिळतात. फॅमिली पिकनिकसाठी अगदी योग्य आहे.
विरारजवळील हे एक लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. विशेषत: पावसाळ्यात येथील हिरवळ आणि धुक्यांचे दृश्य पाहण्यासारखे असते. इथे वेगवेगळी रंगीबेरंगी फुलं देखील पाहायला मिळतात.
वसईच्या वज्रेश्वरी येथील पेल्हार धरण पावसाळ्यात भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. इतर पावसाळी ठिकाणांच्या तुलनेत हे शांत आणि कमी गर्दीचे आहे.
गोकुळकडा धबधबा विरारच्या पूर्व भागात आहे. हे ठिकाण त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखले जाते. आठवड्याच्या शेवटी जाणे योग्य ठरते.
फुलपाडा तलाव विरारमधील सर्वात मोठा जलसाठा म्हणून ओळखला जातो. इथे निसर्गरम्य वातावरणासह तुम्ही एक वन-डे फॅमिली ट्रिपही करू शकता.
देवकुंडी नदी वसई पूर्वेतील कामण रोडजवळ आहे. ही नदी पावसाळी पर्यटनासाठी विशेषत: धबधब्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. इथे जाताना तुम्ही छोट्या ट्रेकचा आनंद घेऊ शकता.
विरारजवळील बेलवाडी धबधबा हा एक Hidden Monsoon Gem आहे. पावसाळ्यात हा धबधबा आणखी विस्तारतो. त्याचे हे निसर्गरम्य दृश्य शांताता देणारे आणि डोळे दीपवणारे असते.