Tanvi Pol
पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता वाढते, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
गरोदर महिलांचे शरीर संवेदनशील असते, त्यामुळे त्यांना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहारात हळद, आल्याचा चहा, लसूण, आणि ताजे फळे समाविष्ट करा.
सीझनल फळं जसं की पेरू, संत्रं, पपई यामुळे व्हिटॅमिन C मिळतं आणि इम्युनिटी बळकट होते.
हिरव्या पालेभाज्या, ओट्स, आणि मूगडाळीचं सेवन केल्यास आवश्यक प्रथिने मिळतात.
दूधात हळद टाकून घेणं संक्रमण टाळण्यासाठी उपयुक्त ठरतं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.