Nashik Waterfalls : नाशिकच्या दऱ्याखोऱ्यांत कोसळणारे ५ धबधबे, निसर्गाच्या अद्भुत सौंदर्यात हरवून जाल

Shreya Maskar

नाशिक

नाशिक हे शहर 'भारताची वाईन राजधानी' म्हणून जगभरात ओळखले जाते. पावसाळ्यात येथे फॅमिली ट्रिप प्लान करा आणि मनसोक्त भिजायला जवळच असलेल्या धबधब्यांना भेट द्या.

Nashik | google

दुगारवाडी धबधबा

नाशिकपासून सुमारे ३८ किमी अंतरावर दुगारवाडी धबधबा वसलेला आहे. सह्याद्रीच्या घनदाट जंगलांनी वेढलेला हा ४५० फूट उंचीचा धबधबा आहे.

Dugarwadi Falls | google

सोमेश्वर धबधबा

नाशिक शहरापासून अवघ्या ७ किमी अंतरावर सोमेश्वर धबधबा आहे. गोदावरी नदीकाठी असलेल्या ऐतिहासिक सोमेश्वर मंदिराजवळ सोमेश्वर धबधबा आहे.

Someshwar Falls | google

विहीगाव धबधबा

विहीगाव धबधब्याला अशोका धबधबा असे म्हणतात. विहीगाव धबधबा हा १२० फूट उंचीचा हंगामी धबधबा आहे. हा धबधबा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे.

Vihigaon waterfall | google

दाभोसा धबधबा

जव्हारजवळ आणि नाशिकपासून सुमारे ८८ किमी अंतरावर दाभोसा धबधबा वसलेला आहे. ३०० फूट उंचीचा हा धबधबा भारतातील काही मोजक्या बारमाही वाहणाऱ्या धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा झिप-लाइनिंग, कयाकिंग आणि व्हॅली क्रॉसिंग यांसारख्या साहसी खेळांसाठी ओळखले जाते.

Dabhosa Falls | google

कळमांडवी धबधबा

नाशिकपासून सुमारे १४० किमी अंतरावर कळमांडवी धबधबा वसलेला आहे. खडकाळ कड्यांनी वेढलेला कळमांडवी धबधबा पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतो. येथे क्लिफ जंपिंग व रॅपलिंगचा आनंद घेता येतो.

Kalmandvi Falls | google

भावली धबधबा

नाशिकपासून सुमारे ५० किमी अंतरावर भावली धबधबा आहे. रोड ट्रिप आणि फोटोशूटसाठी हे ठिकाण बेस्ट आहे.

Bhavli waterfall | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पावसाळ्यात मरीन ड्राईव्ह फिरून कंटाळलात? मग बेलापूरजवळील 'हा' समुद्रकिनारा एकदा पाहाच

Belapur Tourism | saam tv
येथे क्लिक करा...