Shreya Maskar
पावसात बाहेर कांदा भजी खाण्यापेक्षा घरीच कुरकुरीत बेसनाशिवाय कांदा भजी बनवा.
पावसात कांद्याचे भजी बनवण्यासाठी कांदे, तांदळाचे पीठ, तिखट-मीठ, चाट मसाला, आलं-लसूण पेस्ट, ओवा, हिरव्या मिर्चीची पेस्ट, कोथिंबीर, जिरे पावडर इत्यादी साहित्य लागते.
भजी करण्यासाठी बेसनाला पर्याय म्हणून आपण मूग डाळीचे पीठ वापरणार आहोत.
तांदळाचे पीठ भजी कुरकरीत करण्यास मदत करतात.
कांदा भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा स्वच्छ धुवून आडवा कापून घ्यावा.
एका भांड्यात मीठ आणि चिरलेला कांदा घालून कांद्याला पाणी सुटेपर्यंत काही वेळ ठेवा.
कांद्याच्या या मिश्रणात तिखट-मीठ, चाट मसाला, आलं-लसूण पेस्ट, थोडा ओवा, हिरव्या मिर्चीची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जिरे पावडर घाला.
आता या चटपटीत मिश्रणात तांदळाचे पीठ आणि मूग डाळीचे पीठ घालून छान एकजीव करून ५-१० मिनिटांसाठी तसेच ठेवून द्या.
आता गरम तेलामध्ये हे भजी छान तळून घ्या. भजी तळताना गॅस मंद आचेवर ठेवा. यामुळे भजी जळणार नाही.
तुमचे चटपटीत-कुरकरीत बेसनाशिवाय कांदा भजी तयार झाले. या भजींचा पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.