Shruti Vilas Kadam
पावसाळ्यात कपडे नीट सुकत नाहीत मग कपड्यांना कुबट वास येतो. या काही सोप्या टिप्स वापरून कपड्यांचा वास चुटकीसरशी गायब करू शकता.
अर्धवट ओले कपडे कधीही घडी करून कपाटात ठेवू नका.
संधी मिळताच कपडे काही वेळ उन्हात किंवा मोकळ्या हवेत वाळवा.
कपडे धुताना थोडे पांढरे व्हिनेगर घातल्यास दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
बाजारात सुवासिक उत्पादने मिळतात, ती कपडे धुण्याच्या पाण्यात मिसळल्यास कपड्यांना कुबट वास येत नाही.
कपाटात ओलावा साचू देऊ नका. वेळोवेळी दारे उघडून हवा खेळती ठेवा.
कपाटात नीमची पाने किंवा कापूर ठेवल्याने दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
पावसात भिजलेले कपडे जास्त वेळ तसेच ठेवल्यास कुबट वास येतो.
मशीनमध्ये बुरशी किंवा घाण साचल्यास कपड्यांनाही दुर्गंधी येऊ शकते.