फक्त इडली-डोसा नाही! यंदा पावसाळ्यात ट्राय करा 'हे' 5 गरमागरम साऊथ इंडियन पदार्थ

Manasvi Choudhary

पावसाला सुरूवात

पावसाळा सुरू झाला की आठवण येते ती गरमागरम पदार्थांची. महाराष्ट्रात पाऊस म्हटलं की कांदा भजी आणि चहा हे समीकरण पाहायला मिळते.

Kanda Bhaji | Google

इडली , डोसा

मात्र अनेकांना साऊथ इंडियन पदार्थांची खाण्याची आवड असते. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ म्हटले की आपल्याला ओठवते ती म्हणजे नेहमीची इडली किंवा साधा डोसा.

South Indian Foods

साऊथ इंडियन पदार्थ

पण तुम्हाला माहितीये का? फक्त इडली, डोसा नाही तर साऊथ इंडियन हे 6 पदार्थ तुम्ही यंदा पावसाळ्यात नाश्त्याला ट्राय करू शकता.

Monsoon Breakfast Recipe

कुरकुरीत मेदूवडा

रिमझिम पावसात गरमागरम मेदूवडा, ओल्या नारळाची चटणी खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. उडीद डाळीपासून बनवला जाणारा मेदूवडा कुरकुरीत असतो.

Crispy Medu Vada

रवा इडली

पावसाळ्यात हलका फुलका नाश्ता करायचा असेल तर तुम्ही रवा इडली नक्की ट्राय करू शकता. रवा इडलीसाठी पीठ आंबवावे लागत नाही. ही झटपट बनणारी रेसिपी आहे.

Instant Rava Idli

व्हेजिटेबल उत्तपम

डोश्यासारखा बनणारा हा पदार्थ म्हणजे उत्तपम अत्यंत चविष्ट लागतो. कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर आणि हिरवी मिरची या भाज्यांचे मिश्रणत यात असते.

Vegetable Uttapam

लेमन राईस

पावसाळ्यात तुम्हालाही चटपटीत गरमागरम पदार्थ खायचा असेल तर तुम्ही लेमन राईस ट्राय करू शकता. साऊथ इंडियन ही प्रसिद्ध डिश आहे. मोहरी, कढीपत्ता, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लिंबाचा रस घालून हा भात तयार केला जातो.

South Indian Lemon Rice

दालवडा

नाश्त्याला कुरकुरीत दाल वडा खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. कुरकुरीत दाल वडा तुम्ही घरी देखील बनवू शकता. अत्यंत सोप्या पद्धतीने दाल वडा तुम्ही बनवू शकता.

Dal Vada Recipe

NEXT: यंदा 'फादर्स डे' कधी आहे? वडिलांना खूश करणाऱ्या 3 बेस्ट आयडिया

Fathers Day
येथे क्लिक करा...