Monsoon : पावसाळ्यात गादी, उशी अन् बेडवर ढेकणांचा सुळसुळाट? स्वयंपाकघरातील 'हा' एक पदार्थ करेल कमाल

Shreya Maskar

कडुलिंबाची पाने

ढेकणांना कडुलिंबाचा कडूपणा आवडत नाही. जर तुमच्या पलंगावर किंवा कपड्यांवर ढेकणांचा प्रादुर्भाव झाला असेल, तर कडुलिंबाची पाने कुस्करून तिथे ठेवा. त्याच्या सुगंधाने ते दूर पळून जातील.

Neem Leaves | pinterest

कडुलिंबातील पोषण

कडुलिंबामध्ये जीवाणूनाशक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात आणि त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही.

Nutritional Properties of Neem | pinterest

फवारणी करा

ढेकणांवर मारण्यासाठी एक पाणी तयार करा. कडुलिंब आणि कापूराचा तीव्र सुगंध ढेकणांना दूर पळवून लावेल आणि गादीलाही छान वास येईल.

Spray Solution | pinterest

रामबाण उपाय

एका बॉटलमध्ये कडुलिंबाचे तेल, कापूर पावडर आणि पाणी एकत्र करा. हे पाणी ढेकणांचा प्रादुर्भाव असलेल्या भागांवर फवारा. त्याच्या सुगंधाने ढेकूण दूर पळून जातील.

An Effective Remedy | pinterest

बेकिंग सोडा

व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचे पाणी देखील ढेकणांना पळून लावण्यासाठी फायदेशीर ठरेल. व्हिनेगरचा आंबटपणा आणि वास, बेकिंग सोड्याच्या फेसासोबत ढेकणांना पलंगापासून दूर पळवून लावण्यास मदत करेल.

Baking Soda | pinterest

व्हिनेगर

एका बॉटलमध्ये बेकिंग सोडा पावडर, व्हिनेगरमध्ये विरघळवा आणि ढेकणांचा प्रादुर्भाव असलेल्या सर्व भागांवर हलकेच शिंपडा.

Vinegar | pinterest

उन्हात ठेवा

जर फक्त १-२ ढेकूण असतील, तर गादी उन्हात ठेवा. ढेकूण तीव्र उष्णता आणि सूर्यप्रकाशात जगू शकत नाहीत. सूर्याच्या उष्णतेमुळे ढेकूण अंथरुणातून बाहेर पडतील. तसेच, चादरी आणि उशा घाला.

Sun Exposure | pinterest

पावसाळा

पावसाळ्यात थंड वातावरणामुळे ढेकणांचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसल्यास, हेअर ड्रायरच्या हॉट सेटिंगचा वापर करून गादीतील आर्द्रता कमी करा. यामुळेही ढेकूण निघून जातील.

Monsoon Season | pinterest

NEXT : महागड्या ब्युटी प्रॉडक्ट्सची गरज नाही, ५ रूपयांचा 'हा' पदार्थ चेहऱ्यावरील काळे डाग करेल दूर

Monsoon Skin Care | AI PHOTO
येथे क्लिक करा...