Manasvi Choudhary
अनेकदा भरपूर कष्ट करूनही हातात पैसा टिकत नाही किंवा नको त्या ठिकाणी विनाकारण खर्च होतो अशावेळी नेमकं काय करावे हे जाणून घ्या.
घरात पैसा टिकून राहण्यासाठी वास्तू शास्त्राच्या सोप्या टिप्स फॉलो करा.
वास्तूशास्त्रात उत्तर दिशा ही संपत्तीची देवता 'कुबेर' यांची मानली जाते. घराची उत्तर दिशा नेहमी स्वच्छ आणि मोकळी ठेवा
घरामध्ये कपाट नैऋत्य दिशेला तोंड करून ठेवा यामुळे घरामध्ये पैसा राहतो.
वास्तूशास्त्रात, पाण्याला पैशाचे प्रतीक मानले जाते. जर तुमच्या घरातील नळ सतत गळत असतील, तर ते आर्थिक नुकसान दर्शवते.
लक्ष्मीचा प्रवेश मुख्य दारातून होतो, त्यामुळे त्याचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. प्रवेशद्वारावर स्वस्तिक किंवा 'शुभ-लाभ' चिन्ह लावा. सायंकाळी मुख्य दारावर उजेड असावा आणि तिथे चपलांचा ढिगारा नसावा.
घरातील मोडक्या-तोडक्या वस्तू वेळीच फेकून द्या बंद पडलेली घड्याळे, तुटलेले आरसे किंवा फुटक्या काचा घरात ठेवू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.