ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट ठेवणं शुभ मानलं जाते.
घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मनी प्लांटचं रोप असल्याने घरामध्ये धन संपत्ती राहाते.
वास्तूशास्त्रामध्ये, मनी प्लांट लावण्याचे काही खास नियम सांगितले आहेत.
मनी प्लांट घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावलं पाहीजे.
शुक्र ग्रहाची कृपादृष्टी ठेवण्यासाठी मनी प्लांटला लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा बांधावा.
मनी प्लांट चोरी करून लावल्यास घरात अशुभ घटना घडण्याची शक्यता असते.
मनी प्लांट चोरी केल्याने आर्थिक संकटांना सामेरं जावं लागतं.
कोणाच्याही घरातुन मनी प्लांट आणून लावण्याने त्यांच्या घरातल्या पिढा आपल्या घरात येऊ शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.