Shraddha Thik
हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देव किंवा देवीला समर्पित असतो. त्याचप्रमाणे सोमवार हा भगवान भोलेनाथला समर्पित आहे.
सोमवारी पवित्र दिवशी विधीनुसार भगवान शंकराची पूजा करण्याचा विधी आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नियमित पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात.
धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी काही काम करणे चुकिचे आहे. कारण, सोमवारी केलेल्या काही चुका भगवान भोलेनाथांना रागवू शकतात. जाणून घ्या
सोमवारी भगवान शिवाच्या पूजेदरम्यान काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. असे केल्याने भोलेनाथ रागावतात.
तुम्ही सोमवारी भगवान शंकराची पूजा करत असाल तर लक्षात ठेवा की या दिवशी कोणाला त्रास होईल असे काही करू नका. याशिवाय कोणतेही अनैतिक काम करणे टाळा. असे केल्याने जीव धोक्यात येऊ शकतो.
जर एखाद्या व्यक्तीने सोमवारी जुगार खेळणे, चोरी करणे किंवा दुस-या स्त्रीवर वाईट नजर ठेवणे यांसारख्या गोष्टी केल्या तर तो पापाचा भागीदार होतो. त्यामुळे या वाईट गोष्टी करण्यास मनाई आहे.
भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही तुळशीचा वापर करू नये. तुळशीला शापित असून तिच्या पतीचा भगवान शंकराने वध केला असे म्हटले जाते. त्यामुळे शिवपूजेत त्यांची पूजा केली जात नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.