Sakshi Sunil Jadhav
व्यवसायातून चांगला फायदा होईल. नवीन गुंतवणुकीतून फायदा होईल.
ठरवून गोष्टी कराल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवीन दिशा, नवीन मार्ग खुले होतील.
हितशत्रूंचा त्रास संभवतो आहे. खर्चाला धरबंद राहणार नाही. पाण्यासारखा पैसा वाहील.
मित्र-मैत्रिणींचे प्रेम आणि कामे धाडसाने पार पाडाल. जुन्या परिचयामधून आनंद मिळेल.
शासकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल. इतरांपेक्षा वेगळे काहीतरी धाडसाने कराल.
गुरुकृपा लाभण्याचा दिवस आहे. विष्णू उपासना फलदायी ठरणार आहे. दूरचे प्रवास घडतील.
महत्त्वाची कामे रखडण्याची आज शक्यता आहे. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न करता पुढे चला. दिवस संमिश्र आहे.
इतरांवर तुमचा प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभल्यामुळे दिवस आनंदी वाटेल. नवीन काहीतरी गोष्टी आयुष्यात घडतील.
तब्येतीकडे लक्ष द्या. तक्रारी उदभवतील. शासकीय कामात सुधार होण्याची शक्यता आहे. कामात व्यस्त राहाल.
तुम्ही ठरवले ते आज होईल. मुला मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरल्यामुळे यश गाठाल.
आरोग्य चांगले राहणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील. अध्यात्मिक प्रगती होईल. प्रवासातून फायदा होईल.
नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचा सहकार्याने पुढे जाल. प्रेमातून लाभ होतील.