Sakshi Sunil Jadhav
आज प्रवासाचा आनंद लुटाल. आयुष्यामध्ये नव्याने महत्त्वाचा टप्पा आज अनुभवास येणार आहे.
समाजामध्ये मोठे कार्य आज हातून घडेल. करिअर प्रगतीसाठी दिवस चांगला आहे.
सून जावयांच्या प्रेमाने भरून पावलो अशी जाणीव येईल. अनेक लाभ मिळणारा आजचा दिवस आहे.
विनाकारण मानसिक ताण तणाव आज जाणवतील. त्यापासून दूर राहणे जास्त बरे आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल.
दान, दानत, उदारता या आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. यामध्ये आज व्यस्त रहाल.
धना योगाला उत्तम दिवस आहे. पैसा खेळता राहील. कुटुंबीयांच्या सहकार्याने पुढे जाल.
भावंडांचे सौख्य चांगले राहील. जवळचे प्रवास घडतील. पत्र व्यवहार होतील.
जमिनीशी निगडित क्रयविक्रयाचा आज दिवस आहे. घराचे डागडूजीची कामे पूर्ण होतील.
दत्त उपासना फलदायी ठरेल. शेअर्स आणि लॉटरीमध्ये फायदा संभवतो आहे. संततीच्या सुवर्ताने मन आनंदी राहील.
नोकरीच्या ठिकाणी धावपळ असेल. पण यश मिळेल. पण हितशत्रू मध्ये वाढ होईल. काही गोष्टी अंगावर येतील.
जोडीदाराच्या मागण्या मान्य कराव्या लागतील. तडजोडीने संसार चालतो हे आज अधिक जाणवेल. कोर्टात यश मिळेल.
मोठ्या धनलाभाची आज शक्यता आहे. मात्र तो वाममार्गातून नसावा आहे लक्षात घ्या. अनेक फ्रंटवर एकट्यालाच लढावे लागेल.