Sakshi Sunil Jadhav
दैनंदिन कामात अडचणी, खर्चाचे प्रमाण वाढते राहील. कोजागिरी पौर्णिमा जरी असली तरी धावपळीमध्ये आपले महत्त्वाचे ऐवज सांभाळा.
आपल्या मतांवर ठाम राहाल. तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. अनेक लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे.
तुमच्या कार्यक्षेत्रात आज प्रगती होई. प्रतिष्ठा लाभेल. एखादे नवीन पद मिळण्याची शक्यता आहे. आनंदाची बातमी घेऊन येणार आहे.
आजची पौर्णिमा तुम्हाला सुवर्ता कानी घेऊन येईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. विशेष चंद्र उपासना फलदायी ठरेल.
पुढील नियोजनाचे काही निर्णय घेणार असाल तर आजचा दिवस फारसा बरा नाही. वाहने जपून चालवावीत. अचानक धनलाभ मात्र संभवतो आहे.
भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात संधी मिळतील. प्रसिद्धीला मिळेल. दिवस आनंदी आहे.
केलेले श्रम वाया जातील. वेळ आणि पैसा दोन्हीचा उपयोग नाही हे जाणवेल. काही जणांचा मनोरंजनाकडे कल राहील.
मुला मुलींचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. देवी उपासना, इंद्र उपासना आज आपल्याला फळणार आहे. दिवस उत्तम आहे.
प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी घडतील. दिवस चांगला आहे.
नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. शेजारील व्यक्तींकडून फायदा होईल. छोटे प्रवास घडतील.
व्यवसायामध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवनामध्ये आनंद साधाल. रात्र धनदायी आहे.
घरी पौर्णिमेप्रमाणे मन प्रफुल्लित ठेवणारा आजचा दिवस आहे. आयुष्यामध्ये नवीन दिशा नवीन मार्ग मिळणार आहेत.