Sakshi Sunil Jadhav
कामानिमित्त काहींना प्रवास होतील. मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभणारा असा आजचा दिवस आहे. द्रुतगती प्रवास होतील.
आज वाहने जपून चालवावेत. आपल्या खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. अधिक पैशाच्या नादामध्ये चुकीच्या गोष्टी आज करू नका.
भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभण्याचा दिवस आहे. केलेल्या गोष्टींमुळे आपले मनोबल आणि आत्मविश्वास वाढीला लागणार.
मनोरंजनाकडे कल राहणार आहे. आपले मनोबल कमी राहील. मानसिकता स्वस्थ ठेवण्यासाठी आपल्या जवळच्या लोकांबरोबर करावी.
तुम्ही घेतलेल्या निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. व्यवसायामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. रवी उपासना करावी.
आपल्या राशीला आज प्रॉपर्टी सौख्य भरभरून मिळणार आहे. जुने, रेंगाळलेले, रखडलेली कामे आज मार्गी लागतील.
ठरवेल ते करणारच अशी काहीशी जिद्द आणि चिकाटी घेऊन आज वावराल. अर्थात ती तर पण तुम्ही लिलया पार पाडण्यात यशस्वी होणार आहात.
कोणाला कर्ज दिले असेल, उसने पैसे दिले असतील तर आज वसूल होणार आहेत. आपलं कोण परक कोण याची जाणीव होईल.
आपले आरोग्य आज चांगले राहणार आहे. तक्रारी कमी होतील. सकारात्मक प्रवृत्ती वाढीस लागेल.
आयुष्यात अडचणी आल्याशिवाय अध्यात्माकडे मन वळले जात नाही. आज काही कटकटी वाढतील. त्यामुळे अध्यात्माकडे कल वाढेल.
अनेकांच्या सहकार्याने आज पुढे जाणार आहात. ठरवलेल्या गाठीभेटी पार पडतील. दिवस चांगला आहे.
पद, प्रतिष्ठा वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या बॉसची विशेष करार मदार तुमच्यावर राहील. दिवस चांगला आहे.