Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या झोपेच्या वेळा बदलत चालल्या आहेत.
कमी झोपेचे परिणाम तुमच्या शरीरावर होतो. त्यामुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल्सच्या समस्या वाढतात.
आता तुम्हाला यावर एक सोपा उपाय करता येणार आहे. तुम्हाला त्यासाठी महागड्या पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही.
तुम्ही हा घरगुती उपाय केल्याने चेहऱ्याचा ग्लो वाढेल, चेहरा चमकेल आणि तुम्ही सुंदर दिसाल.
मुळात डार्क सर्कल्स हे झोपेची कमी, वाढतं वय, जेनेटिक्स, एलर्जी डिहायड्रेशन, स्कीनचा अती वापर हे मुळ कारण आहे.
तुम्ही यासाठी कच्चं दूध चेहऱ्याला लावू शकता. त्याने चेहरा हायड्रेट होईल.
कच्चं दूध, हळद, मध, कॉफी पावडर याचे मिश्रण चेहऱ्याला लावा.
तुम्हाला हे १० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवावे लागेल. मग कोमट पाण्याने चेहरा क्लीन करुन घ्यावा.