Monday Horoscope: ‘त्या’ व्यक्तीपासून दूर राहा नाही तर वैवाहिक जीवनात… कुणाच्या राशीत आज काय? वाचा सोमवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

मांडीशी निगडीत दुखणे आणि आजार आज विशेष जपावे लागतील. अडचणीतून मार्ग काढून इथपर्यंत आला आहात. भगवंताची विशेष कृपा आज आपल्यावर आहे.

मेष राशी | saam

वृषभ

मनात नसताना काही गोष्टींमध्ये तुम्ही अडकले जाल. आज मात्र सरकारी कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. आपले कोण परके कोण हे ओळखून पुढे जावे लागेल.

वृषभ | Saam Tv

मिथुन

व्यवसायाची नव्याने ओळख होईल. इतर ओळखी करून द्या. घवघवीत यश मिळण्याचा आजचा दिवस आहे. कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल. कोर्टाच्या कामातही यश मिळेल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. खराब, बाधित पाण्यापासून त्रास होण्याचा संभव आहे. मनस्थिती सांभाळावी लागेल. अडचणींचा सामना करून पुढे जा.

कर्क राशी | saam

सिंह

उपासना मार्गांमधून यश मिळेल. रवी उपासना विशेष फायदेशीर ठरेल. आपला इतरांवर थोडा वरचढपणा राहणार आहे. समाजामध्ये मान वाढेल.

सिंह राशी | saam

कन्या

आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. सौख्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. शेतीवाडी, गुरढोरे यामधून धनयोग संभवत आहेत.

कन्या | Saam Tv

तुळ

कलाक्षेत्रातील लोकांना आजवर केलेल्या कामाचा फायदा होणार आहे. नव्याने ओळखी होऊन पुढे जाल. भाग्यचे द्वार आपोआप खुले होणार आहे.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

तिखट, मसालेदार, चटकदार पदार्थ खाण्याची लहर येईल. नवीन व्यवसायाच्या बाबतीत विचार करणार असाल तर कुटुंबीयांशी सल्ला मसलत करून निर्णय घ्या.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

एक वेगळा उत्साह, उमेद तुमच्या मध्ये भरलेली असेल. आपल्या सकारात्मकतेने इतरांना आपलेसे करावे लागेल. वेगळे धाडस आणि साहस करण्यासाठी मन उत्सुक असेल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

खुलेपणाने हार मानवी लागेल. अडचणींचा ससेमिरा संपणार नाही असे वाटेल. मनोबल जरी खराब असेल तरी जवळच्या लोकांच्या कडून आधार मिळेल असे नाही.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

जुन्या गुंतवणुकी मधून फायदा होईल. मनासारख्या घटना घडणार आहेत. मैत्रीचे स्नेहबंध नव्याने जुळून येतील. स्नेहभोजनाची योग आहेत.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

प्रसन्नतेचा दिवस आहे. आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन चला इतरांसाठी काहीतरी पुण्यकारक काम करण्यासाठी आज पुढे व्हाल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: कांदेपोहे कधी चिकट तर कधी वातड होतात? मग या 8 टिप्स करा फॉलो

kande pohe recipe | saam tv
येथे क्लिक करा