Sakshi Sunil Jadhav
आज घटस्थापने सारखा शुभ दिवस नव्याने संकल्प करायला हरकत नाही. अडचणींवर मात करून पुढे जाणार आहात. उपवास करताना सावधानता बाळगावी.
घटस्थापना आणि आजचा दिवस तुम्हाला शुभ गोष्टी आयुष्यात घेऊन आलेले आहेत. देवी उपासना करावी. फलदायी ठरेल.
धार्मिक कार्यामध्ये विशेषत्वाने आज सहभाग घ्याल. कुटुंबीयांच्या पाठिंबामुळे मनासारख्या घटना आज घडणार आहेत. प्रॉपर्टीशी निगडित व्यवहार मार्गी लागतील.
कासवाच्या गतीने पण निश्चित यश मिळवणारी अशी आपली रास आहे. काही वेगळेपण घेऊन आजचा दिवस आलेला आहे. जवळचे प्रवास होतील.
सणासुदीच्या दिवसांमध्ये आपली रास पैशाचा, खर्चाचा विचार करत नाही. आज दान, दानत उदारता चांगली राहील.
भावनिकता जपणारी सोज्वळ अशी आपली रास आहे. नव्याने संकल्प घ्या की जे सिद्धीस जातील. हिशोबामध्ये काटेकोर रहाल. आरोग्य उत्तम राहील.
खर्चाला धरबंध राहणार नाही. मानसिकता थोडी दोलायमान राहील. अध्यात्माची कास धरल्यास दिवस चांगला आहे. बंधन योग आहेत.
कुलाधर्म अर्थात घटस्थापना आज श्रद्धापूर्वक केल्याने अनेक लाभ आपल्या आयुष्यात येणार आहेत. जुनी येणी वसूल होतील.
कामाची धावपळ आणि दगदग आज जाणवणार आहे. पण तरीसुद्धा देवीचे विशेष आशीर्वाद बढतीचे योग आहेत.
"लेट पण थेट" जाणारी आपली रास आहे. तीर्थ टनाला जाऊन आज प्रगती होईल. उपासनेमधून वृद्धीचे दिवस दिसत आहेत. दिवस सुंदर आहे.
मनाचे घट आज भरलेले राहतील. ठाम निर्णयावर राहिल्यास पुढील वाटचाल सुकर होईल. कामाची वाढ होईल.
व्यवसायावर विशेष लक्ष केंद्रित कराल. नवे संकल्प, नव्या गोष्टी, नवीन परिचय, बैठका आणि नियोजन यामध्ये धावपळीचा आजचा दिवस असेल.