Sakshi Sunil Jadhav
आज कामिका एकादशी आहे. घरातील वातावरण एखाद्या छोट्या धार्मिक कार्यामुळे प्रसन्न राहील. पैशासाठी धन योगासाठी विशेष संकल्प केले जातील.
स्वास्थ छान राहील. आपली एकादशी आपल्या मनातच आहे. आरोग्य उत्तम राहील.
इतर काय म्हणतात हे महत्त्वाचे नाही आपल्याला काय वाटते हे बघून काम करा. अनावश्यक खर्च निघतील.
जुने केलेल्या गोष्टीतून लाभ मिळणार आहे. पण ते प्रत्यक्षात येण्यापर्यंत वेळ लागेल.
आपला कार्यकारण भाव चांगला राहील. सामाजिक पद, पैसा, प्रतिष्ठा यांनी भारलेला दिवस असेल. मानसन्मान मिळतील.
हरवले ते गवसेल आज असा दिवस आहे. अनेक दिवस ज्याची वाट पाहत आहात अशा काही घटना आणि सुवर्ता कानावर येतील.
आपलं कोण परक कोण हे ओळखून आज कामे करा. मैलाचा दगड पार पाडावा लागेल. तेवढेच अनुभवानी सिद्ध व्हाल.
व्यवसायामध्ये उडी मारणे किंवा नवीन गोष्टीच्या संकल्पना रुजवणे यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
पायाशी निगडित आजार उद्भवतील.दोलायामान मनस्थिती मुळे होणारे परिणामांना तोंड द्यावे लागेल.
"अबोल प्रीत बहरली" असा काहीसा दिवस आहे. मनातील भावना व्यक्त होणार नाहीत. पण आज करा असा सल्ला राहील.
नव्या काही गोष्टी उत्खनन कराव्याशा वाटतील. अभ्यासाचा ध्यास राहील. प्रगतीची आस राहील. संशोधनाची कास राहील. दिवस चांगला आहे.
जोडलेल्या गोष्टीचे बंध अधिक दृढ होतील. प्रेमामध्ये विशेष लाभ होतील. जवळच्या व्यक्तीमुळे अनेक संधी येतील.