Monday Horoscope: पैशांची तंगी होईल दूर, ३ राशींच्या व्यक्तींचे कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार आहे. आपले कोण परके कोण ओळखून पुढे जा. मात्र हित शत्रूंवर मात कराल. आजोळी संबंध दृढ होतील.

मेष राशी | saam

वृषभ

मुला मुलींचे प्रश्न आज मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात नव्याने धाडस करायला हरकत नाही. लक्ष्मीची विशेष कृपा आज तुमच्यावर राहील. कलाक्षेत्रात घोडदौड होईल.

वृषभ | Saam Tv

मिथुन

तुमच्या क्षेत्रांमध्ये सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभणार आहे. नव्याने वस्तू खरेदी करण्यासाठी दिवस आज सुदिन आहे म्हणायला हरकत नाही.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

जिद्द आणि चिकाटी घेऊन कामामध्ये कार्यरत रहाल. नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नवनवीन संधी आज आपल्या आयुष्यात येणार आहेत.त्याचे सोने करा.

कर्क राशी | saam

सिंह

इतरांवर आपली पगडा राहील. आपला पगडा राहील. मात्र तसेच जबाबदारीने कुटुंबीयांसाठी कामे करावी लागतील. मेहनतीला पर्याय नसेल पण एक वेगळा आनंद आज मिळेल. कुटुंबात रमाल.

सिंह राशी | saam tv

कन्या

आपली बौद्धिक तसेच अर्थतत्वाची असणारी रास आहे. आर्थिक लाभाचे आज प्रमाण मनाप्रमाणे, समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होणार आहेत. दिवस मनासारखा जाईल.

कन्या | Saam Tv

तूळ

महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर उरकून घ्या. विनाकारण खर्च वाढणार आहेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. ध्यानीमनी नसताना पुढे अडचणी उभ्या राहतील. दिवस संमिश्र आहे.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

प्रियजनांचा सहवास लाभेल. दिवस चांगला जाईल. नव्याने हितसंबंध निर्माण होणार आहेत. थोडी आपल्या स्वभावाला मुरड घातली तर जुन्या गोष्टी सुद्धा नव्याने जुळून येतील. धनलाभ उत्तम.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

वरिष्ठांच्या सहकार्याने पुढे जाल. शासकीय कामे सुद्धा मार्गी लागतील. मनाची दोलायमान अवस्था टाळणे आज गरजेचे आहे. कर्म प्रधान ठेवून कामे करावीत.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

मानसिक स्वास्थ आणि समाधान लाभून प्रगतीचे योग आज सहज जुळून येणार आहेत. भाग्याची दालने खुली होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सद्गुरूंचे विशेष आशीर्वाद आज लाभतील.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

अडीअडचणींना कारण लागत नाही. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. वाहने जपून चालवावीत. आपण सावधगिरीने कामे करणे आज गरजेचे आहे. इतरांना दोष देऊन उपयोग नाही.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला आज लाभदायक ठरेल. काही गोष्टी इतरांच्या सल्ल्याने गेल्याने फायदा होतो हे आज जाणवेल. कोर्टाच्या कामात मनासारखे यश मिळेल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: मृत्यूच्या २४ तासाआधी दिसणारी तीन प्रमूख लक्षणे जाणून व्हाल थक्क; तज्ज्ञांनी दिली माहिती

Death Signs befor one day | saam tv
येथे क्लिक करा