Sakshi Sunil Jadhav
एखादी महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर येऊन पडेल. अर्थात ती पेलण्याची ताकद आज तुमच्यात आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील.
जुनी येणी वसूल होणार आहेत. वरिष्ठांच्या सहकार्यामुळे सहज काही गोष्टी घडतील. धन योगाला दिवस चांगला आहे.
आज आपल्याला जोडीदाराची अपेक्षित साथ लाभणार आहे. व्यवसाय आणि व्यापारात सुयश मिळण्याचे योग आहेत.
आयुष्यात अडचणी आल्याशिवाय अध्यात्माची ओढ कळत नाही. आज काही त्रास उद्भवेल ज्यामुळे आपला अध्यात्माकडे कल राहील.
महत्त्वाच्या पत्र व्यवहाराला आजचा दिवस चांगला आहे.नव्याने हितसंबंध प्रस्थापित होतील असे दिसते आहे. दिवस चांगला आहे.
तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली घोडदौड आज होणार आहे. सरकारी कामे शासकीय गोष्टी काही रखडले असतील तर आज मार्गी लागतील.
महत्त्वाच्या गोष्टी कानावर येतील. यशाची दारे आपोआप उघडतील. भाग्यकारक घटना घडण्याचा आजचा दिवस आहे. देवी उपासना फलदायी ठरेल.
दैनंदिन कामे यामध्ये अडचणी येण्याचा संभव आहे. स्वभावाप्रमाणे तापटपणा आज वाढेल. बरे नाहीतर "आ बैल मुझे मार" अशी अवस्था होईल.
आयुष्याला नवीन दिशा, नवे मार्ग सापडणार आहेत. एकूणच उत्साह उमेद वाढवणाऱ्या घटना आज घडतील. दिवस चांगला आहे.
कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य आज लाभणार आहे. मात्र काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील .आपल्या तब्येतीकडे बेदखल करू नये. असा आज सल्ला आहे.
संतती सौख्याला दिवस उत्तम आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. दिवस चांगला आहे.
प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. आलेल्या गोष्टींची दोन हात करण्याची ताकद आपल्यात येईल. आत्मविश्वास वाढेल.