Siddhi Hande
उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. उपवासासाठी तुम्ही साबुदाण्याची इडली बनवू शकतात.
वरई, साबुदाणा पीठ, सोडा, दही, पाणी आणि मीठ
सर्वात आधी तुम्हाला वरई, साबुदाण्याच्या पीठात पाणी टाकून ठेवायचे आहे. त्यात दही आणि बेकिंग सोडा टाका.
हे मिश्रण १५-२० मिनिटे तसेच ठेवा. यानंतर त्यात मीठ टाकून छान फेटून घ्या.
यानंतर तुम्ही इडली पात्रात १ लिटर गरम पाणी टाकून गरम करा.
यानंतर इडलीच्या साच्यावर तेल लावून त्यात हे पीठ टाका.
यानंतर हा साचा इडली पात्रात ठेवून १५ मिनिटे शिजवून घ्या.
यानंतर इडली पात्रातून साचा काढून घ्या. ५ मिनिटे थंड झाल्यानंतर त्यातील इडली काढून घ्या.
तुम्ही ही उपवासाची साबुदाणा इडली दही किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात.