Sakshi Sunil Jadhav
पचनसंस्थेसाठी हलकं, सोपं आणि पौष्टिक अन्न हवे असल्यास हे गट-फ्रेंडली व्हेज सूप उत्तम पर्याय ठरू शकेल. हंगामी भाज्यांपासून तयार होणारे हे सूप शरीराला उष्णता देतानाच पचन सुधारण्यास मदत करते.
हे सूप सहज पोटाला पचणाऱ्या हंगामी भाज्यांपासून तयार केले जाते. त्यामुळे पोटावर ताण येत नाही.
कमी जड मसाले टाळल्यामुळे हे सूप गॅस, अॅसिडिटी आणि अपचनाच्या त्रासात फायदेशीर ठरते.
गाजर, भोपळा, बीन्स, ब्रोकली यांसारख्या भाज्यांमध्ये फायबर आणि आवश्यक पोषक घटक असतात. पालक किंवा मेथीमुळे सूपमध्ये आयर्न आणि अँटीऑक्सिडंट्स वाढतात.
वरील भाज्या मंद आचेवर भाज्या शिजवल्याने त्यातील पोषणमूल्य टिकून राहील.
सूप पूर्णपणे ब्लेंड न करता थोडे टेक्स्चर ठेवल्यास चव आणि पचन दोन्ही सुधारते.
ऑलिव्ह ऑइल हृदयासाठी चांगले असून सूप अधिक हेल्दी बनवते.
सकाळ, दुपार किंवा रात्री हे सूप कोणत्याही वेळी घेता येते. सर्दी, थकवा किंवा पोट बिघडल्यावर हे सूप शरीराला आराम देणारे ठरते.