Shreya Maskar
पावसात गरमागरम मोमोज तर आपण घरी बनवतो. पण मोमोजची खरी चव ही त्याच्या चटणीत असते.
अनेकांची मोमोजची चटणी बिघडते आणि मग मोमोजना चव राहत नाही. चला तर मग आज घरी चटपटीत चटणी कशी बनवावी जाणून घेऊयात.
मोमोजची लाल चिटणी बनवण्यासाठी काश्मिरी लाल मिरची, टोमॅटो, लसूण, अजीनोमोटो पावडर, तिखट-मीठ, साखर, मॅगी मसाला, तेल इत्यादी साहित्य लागते.
मोमोजची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम वाळलेल्या काश्मिरी लाल मिरच्या गरम पाण्यात थोड्या वेळसाठी भिजवून ठेवा.
भिजवलेल्या मिरच्या, लाल तिखट, चिरलेले टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्या. नंतर यात थोडे पाणी खालून नीट पेस्ट बनवा.
आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चटणीचे मिश्रण गाळणीने गाळून घ्या.
थोड्या वेळानंतर यात मीठ, साखर, अजीनोमोटो आणि मॅगी मसाला टाकून छान परतून घ्या.
आता ८ ते १० मिनिटे चटणी मंद आचेवर परतून घ्या.
अशा पद्धतीने चायनीज रेस्टॉरंट स्टाईल चटणी काही मिनिटांत तयार झाली.
मोमोजची चटणी दीर्घकाळ टिकण्यासाठी तुम्ही हवा बंद डब्याचा वापर करा.