Shreya Maskar
ऑफिसला जायला उशीर झाल्यावर झटपट आलू भुजिया भात बनवा. कमी वेळात छान चव येईल.
आलू भुजिया भात बनवण्यासाठी साहित्य शेंगदाणे, बटाटा, उकडलेला भात, हिरवी मिरची, तेल, कोथिंबीर, जिरे, मोहरी, लिंबाचा रस, हिंग, तमालपत्र, हळद इत्यादी साहित्य लागते.
आलू भुजिया भात बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल घालून जिरे, मोहरी, तमालपत्र आणि तिखट छान घालून तडतडून घ्या.
आता त्यामध्ये बटाट्याच्या फोडी, बारीक चिरलेला कांदा आणि शेंगदाणे घालून छान परतून घ्या.
बटाटे शिजल्यावर त्यात मीठ, हळद, हिरवी मिरची, लिंबाचा रस घालून मिश्रण छान एकत्र करून घ्या.
शेवटी उकडलेला भात त्यामध्ये घाला आणि 7 ते 8 मिनिटे सर्व छान शिजवून घ्या.
आता या मिश्रणात बाजारात उपलब्ध असणारे नमकीन आलू भुजिया टाका. भात खमंग होईल.
तुम्हाला भाताची चव आणखी वाढवायची असल्यास त्यात भाजलेल्या काजूचे तुकडे, मका, मटार इत्यादी पदार्थ टाकू शकता.
शेवटी भात कोथिंबीरीने सजवा.
हा भात गरम खाण्यास जास्त मजा होईल. तुमचा टिफिन मिनिटांत फस्त होईल.