Momo and Chutney Recipe: सगळ्यांच्या आवडतं स्ट्रीट फूड मोमो आणि चटणी घरच्या घरी कसं करायचं? वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

मोमोसाठी लागणारे साहित्य

मैदा – २ कप, कॉर्नफ्लोअर – २ टेबलस्पून, मीठ – चवीनुसार, पाणी – मळण्यासाठी, कोबी – १, कप (बारीक चिरलेली), गाजर – ½ कप (किसलेले), कांदा – १ (ऐच्छिक), आलं-लसूण पेस्ट – १ टीस्पून, सोया सॉस – १ टीस्पून, मिरी पूड – ½ टीस्पून, तेल – १ टीस्पून

Momo Chutney Recipe | Social Media

मोमोचे पीठ मळा

मैदा, कॉर्नफ्लोअर आणि मीठ एकत्र करून पाणी घालत मऊ पीठ मळा. झाकून २० मिनिटे ठेवा.

Momo Chutney Recipe | Social Media

स्टफिंग तयार करा

कढईत थोडे तेल गरम करून आलं-लसूण परता. त्यात कोबी, गाजर, कांदा घालून २–३ मिनिटे परता. सोया सॉस, मीठ, मिरी घालून गॅस बंद करा.

Momo Chutney Recipe | Social Media

मोमो तयार करा

पीठाच्या लहान गोळ्या करून पातळ पोळ्या लाटा. मध्यभागी स्टफिंग ठेवून कडा घडी घालून मोमो बंद करा.

Momo Chutney Recipe | Social Media

मोमो वाफवून शिजवा

स्टीमरमध्ये किंवा चाळणीवर मोमो ठेवून १०–१२ मिनिटे वाफवा. मोमो चमकदार झाले की तयार.

Momos

मोमो चटणी तयार करा

टोमॅटो – ३ (उकडलेले), सुक्या लाल मिरच्या – ३–४, लसूण – ४ पाकळ्या, मीठ – चवीनुसार, व्हिनेगर किंवा लिंबाचा रस – १ टीस्पून, सगळे साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्या. हवी असल्यास थोडे पाणी घाला.

Momos Recipe | Google

गरमागरम सर्व्ह करा

गरम मोमो तिखट चटणीसोबत सर्व्ह करा. वरून थोडा तीळ किंवा कोथिंबीर टाकू शकता.

Momo Chutney Recipe | Social Media

Fruit Cake Recipe: लहानमुलांसाठी या विकेंडला बनवा टेस्टी फ्रूट केक, वाचा सोपी रेसिपी

Fruit Cake Recipe
येथे क्लिक करा