Shruti Vilas Kadam
मैदा – १ कप, साखर पावडर – ¾ कप, दही – ½ कप, तेल किंवा वितळलेले बटर – ½ कप, मिक्स ड्राय फ्रूट्स – ½ कप, टुटी फ्रुटी – ¼ कप, बेकिंग पावडर – १ टीस्पून , बेकिंग सोडा – ½ टीस्पून, व्हॅनिला एसन्स – १ टीस्पून, दूध – आवश्यकतेनुसार
ड्राय फ्रूट्स छोटे तुकडे करून थोड्या मैद्यात कोट करून ठेवा. यामुळे बेक करताना ते खाली बसत नाहीत.
ओव्हन १८०°C तापमानावर १० मिनिटे प्रीहीट करा. कढईत केक बनवत असाल तर झाकण ठेवून १०–१५ मिनिटे गरम करा.
एका भांड्यात दही, साखर पावडर आणि तेल एकत्र करून चांगले फेटा. मिश्रण स्मूथ झाल्यावर व्हॅनिला एसन्स घाला.
आता मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चालून ओल्या मिश्रणात घाला. गरजेनुसार थोडे दूध घालून मध्यम जाडसर पीठ तयार करा.
तयार पीठात ड्राय फ्रूट्स आणि टुटी फ्रुटी हलक्या हाताने मिसळा. हे मिश्रण ग्रीस केलेल्या टिनमध्ये ओता आणि ३५–४० मिनिटे बेक करा.
तयार पीठात ड्राय फ्रूट्स आणि टुटी फ्रुटी हलक्या हाताने मिसळा. हे मिश्रण ग्रीस केलेल्या टिनमध्ये ओता आणि ३५–४० मिनिटे बेक करा.
केक पूर्णपणे थंड झाल्यावर तुकडे करा. तुमचा एगलेस फ्रूट केक सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.