Manasvi Choudhary
मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अगदी झोपण्यापासून ते जेवणापर्यंत आणि वॉशरुममध्येही अनेकजण मोबाईल वापरतात.
अनेकांना तर टॉयलेटमध्येही मोबाईल वापरण्याची सवय असते. पण ही सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
वैद्यकीय माहितीनुसार, टॉयलेटमध्ये दीर्घकाळ मोबाईल वापरल्याने आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. या सवयीमुळे शरीरावर काय परिणाम होतो ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
टॉयलेटमध्ये मोबाईल वापरण्याची सवय असल्यामुळे अनेक जण ५ मिनिटांऐवजी तब्बल १५ ते २० मिनिटे टॉयलेट सीटवर मोबाईल पाहत बसून राहतात. टॉयलेट सीटवर विनाकारण जास्त वेळ बसून राहिल्याने गुदवाराच्या नसांवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे मूळव्याध सारख्या गंभीर आजाराचा त्रास उद्भवू शकतो.
टॉयलेटमध्ये बॅक्टेरिया असतात यामुळे टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने स्क्रीनवर हानीकारक बॅक्टेरिया जमा होतात, जे नंतर आपल्या हातातून चेहऱ्यावर किंवा अन्नाद्वारे पोटात जाऊन आरोग्य धोक्यात आणू शकतात.
टॉयलेटमध्ये मान खाली करून सतत मोबाईलकडे बघितल्याने मान, खांदे आणि पाठीच्या स्नायूंवर तीव्र ताण येतो. यामुळे पाठीचा कणा आणि मानेच्या स्नायूंमध्ये वेदना होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.