ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकल जवळपास सगळी कामे घरबसल्या मोबाईलवरच होतात. लहान असो की मोठा सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन असतो.
काहींना मोबाईलची येवढी सवय असते की ते मोबाईलशिवाय राहू शकत नाही. त्यांना एका प्रकारचे व्यसन असते. परंतु याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
जास्त वेळ मोबाईलचा वापर केल्याने मेंदूवर नकारात्मक परिणाम होतात. यामुळे स्मरणशक्ती कमी होते आणि एकाग्रता कमी होते.
मोबाईलच्या अतिवापराने झोपेची गुणवत्ता खालावते आणि झोप न येण्याची समस्या होऊ शकते.
मोबाईल अतिवापराच्या सवयीमुळे डोळ्यांवर परिणाम होतो त्यामुळे डोळ्यांची नजर कमजोर होते.
अधिक काळ मोबाईलचा वापर केल्यास मानसिक ताण वाढतो आणि यामुळे अॅंग्झायटी, उच्चरक्तदाब यांसारखे समस्या वाढतात.
जास्त वेळ मोबाईल वापरल्यामुळे हातावर ताण येऊन हात दुखतो त्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.
मोबाईलचा अतिवापर म्हणजे अधिक काळापर्यंत स्क्रीन टाइम. जास्त स्क्रीन टाइममुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. आणि भविष्यात मायग्रेनची समस्या होऊ शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: रोज एक संत्री खा अन तंदुरुस्त राहा; वाचा संत्री खाण्याचे जबरदस्त फायदे