ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने अनेक फायदे होतात. संत्रीमध्ये असलेले पोषक तत्व शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
संत्री हे औषधी गुणधर्माने परिपूर्ण फळ आहे.रोज एक संत्री खाल्ल्याने अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतील.
संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटमिन सी, प्रोटीन, कार्बोहायड्रेटस सारखे पोषक तत्व असतात.
मधुमेह रुग्णांसाठी संत्री हे एक उत्तम फळ आहे. संत्र्यामध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
हिवाळ्यात केस गळण्याची समस्या वाढते. त्यामुळे रोज एक संत्री खाल्ल्याने केस गळण्याची समस्या कमी होते.
संत्र्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे संत्री खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते.
संत्र्यामध्ये असलेले मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.
रोज एक संत्री खाल्ल्याने कॅन्सर सारख्या आजारांचा धोका कमी होतो. तसेच संत्रीच्या सेवनाने शरीराला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: तुम्हालाही गोड खायला आवडतं का? साखरेच्या अतिसेवनाने आरोग्यावर होतात 'हे' दुष्परिणाम; जाणून घ्या