Siddhi Hande
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्रभर पोलिस स्टेशनबाहेर आंदोलन केले. कार्यकर्त्यांना अटक केल्यामुळे त्यांनी हे आंदोलन केले.
यामुळे जितेंद्र आव्हाड हे चांगलेच चर्चेत आले आहेत. काल रात्रभर त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता.
जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे निकतवर्तीय मानले जातात.
मुंब्रा-कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड निवडून आले आहेत. सलग चौथ्यांदा ते आमदार आहेत.
जितेंद्र आव्हाड यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांनी ठाण्यातून आपले शिक्षण पूर्ण केले.
त्यांनी बी.ए.एम.एल.एस म्हणजे मास्टर ऑफ लेबर स्टडीजमध्ये शिक्षण पूर्ण केले.
जितेंद्र आव्हाड यांना मुंबई विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवीदेखील मिळाली आहे.