Shreya Maskar
फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी कस्टर्ड पावडर, दूध, साखर, ड्रायफ्रुटस, ताजी फळे आणि व्हॅनिला एसेन्स इत्यादी साहित्य लागते.
फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये दूध गरम करून घ्या.
एक उकळी आल्यानंतर त्यात साखर टाकून मंद आचेवर गरम करा.
दुसरीकडे एका बाऊलमध्ये कस्टर्ड पावडर घेऊन त्यात थंड दूध घालून पेस्ट तयार करा.
उकळी आलेल्या दुधात तयार कस्टर्ड पावडर टाकून मिश्रण छान एकजीव करा.
तुमच्या आवडीची फळे कापून दुधात मिक्स करा.
त्यानंतर यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुटस आणि व्हॅनिला एसेन्स टाका.
शेवटी फ्रुट कस्टर्ड फ्रिजमध्ये काहीवेळ थंड होण्यासाठी ठेवा.