Siddhi Hande
साउथ इंडियन पदार्थ हे सर्वांनाच आवडतात. त्यात डोसा तर लहान मुलांना खूप आवडतो.
तुम्ही नेहमीचा डोसा हा अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनवू शकतात. घरी मिक्स डाळींचा डोसा नक्की ट्राय करा.
नाचणी, काळे चणे, चण्याची डाळ, उडीद डाळ, मूग डाळ,तूर डाळ , पाणी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, आलं, मीठ, तूप किंवा बटर
सर्वात आधी सर्व डाळी छान धुवून घ्या. या डाळी रात्रभर भिजत ठेवा.
दुसऱ्या दिवशी या डाळींमधील सर्व पाणी काढून टाका. हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक करा.
याच मिश्रणात हिरव्या मिरच्या आले आणि थोडा कढीपत्ता टाकून बारीक करा. यात थोडं थोडं पाणी टाका.
या मिश्रणात मीठ टाकून ते छान फेटून घ्या. मिश्रण १५ मिनिटे बाजूला ठेवा.
यानंतर डोसा बनवण्याचा तवा घ्या. त्यावर बटर किंवा तूप लावा.
त्यावर हे बॅटर टाकून छान डोसा बनवा. हा डोसा कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घ्या.