Crunchy Sev Recipe: संध्याकाळच्या स्नॅकसाठी घरीच बनवा कुरकुरीत लसूण शेव, चहासोबत तोंडी लावायला परफेक्ट डिश

Dhanshri Shintre

साहित्य

लसूण, जिरं, ओवा, डाळीचं पीठ, तांदुळाचं पीठ, तेल, मीठ, हळद आणि तिखट असे सर्व साहित्य तयार ठेवा.

लसूण सोलून घ्या

सुरुवातीला लसूण सोलून घ्या आणि मिक्सरमध्ये लसूण, जिरं व ओवा एकत्र करून स्मूद पेस्ट तयार करा.

पीठ तयार करा

डाळीचं आणि तांदळाचं पीठ एका भांड्यात घ्या, त्यात तिखट, हळद आणि तयार केलेली लसूण पेस्ट घालून नीट मिसळा.

फोडणी द्या

या मिश्रणात गरम तेलाची फोडणी घाला. यामुळे शेव अधिक कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट तयार होते.

कणिक मळून तयार करा

हळूहळू पाणी घालत हे मिश्रण एकत्र करून घट्ट, चांगली कणिक मळून तयार करा.

शेव साच्यातून दाबून टाका

गरम तेलात थोडी थोडी कणिक शेव साच्यातून दाबून टाका आणि सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

शेव तळा

शेव दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळा आणि नंतर हवाबंद डब्यात भरून टिकवून ठेवा.

NEXT: समोसा चाट विसरा! हिवाळ्यात खास बनवून खा चटपटीत रताळ्याची चाट, वाचा परफेक्ट स्ट्रीट-स्टाईल रेसिपी

येथे क्लिक करा