Siddhi Hande
अभिनेत्री मिताली मयेकर नेहमीच आपल्या आपल्या मराठमोळ्या अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. मितालीच्या मंगळसूत्राची डिझाइन तुम्ही ट्राय करु शकतात.
मिताली मयेकर नेहमीच वेगवेगळ्या साड्यांवर युनिक डिझाइन्सचे मंगळसूत्र घालत असते. काठपदर ते अगदी वेस्टर्न साडीवर घालायला तिच्याकडे मंगळसूत्राच्या छान डिझाइन आहेत.
तुम्ही पैठणी साडीवर पारंपारिक काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घालू शकता. त्यामध्ये दोन वाट्या असल्यावर ते अजूनच छान दिसतं.
लग्नासाठी तुम्ही पारंपारिक दोन वाट्यांचे सोन्याचे मंगळसूत्र घालू शकतात. त्यात काळे मणी जास्त असतात.
पूर्ण सोन्याची डिझाइन असलेले मंगळसूत्रदेखील छान दिसते. काठपदर साडीवर हे मंगळसूत्र उठून दिसेल.
तुम्ही कॉटनच्या साडीवर सिंपल शॉर्ट मंगळसूत्र घालू शकतात. त्यामध्ये डायमंडचे पेडंट सुंदर वाटेल.
कोणत्याही कॉटन किंवा सिल्क साडीवर ऑक्साइड मंगळसूत्र घालू शकतात. सध्या या मंगळसूत्रांची फॅशन आहे.
तुमच्या मंगळसूत्रात फक्त एक डायमंडचा खडा असेल तरी ते खूप सुंदर दिसते. शॉर्ट अन् क्युट पेडंट असलेले हे मंगळसूत्र छान दिसते.
पैठणी साडीवर पारंपारिक स्टाईलचे मंगळसूत्र घालू शकतात.त्यावर जास्त डिझाइन नसेल तरी ते सुंदर दिसेल.
Next: काळी साडी, नाजूक कंबर अन् मराठमोळा साज श्रृंगार; तिळगुळाहून गोड ज्ञानदाचं सौंदर्य