Manasvi Choudhary
ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चन बी टाऊनच्या फेवरेट कपलपैंकी एक आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. त्याचसोबत ती पती अभिषेक बच्चन तसंच मुलगी आराध्यामुळे लाईटलाईटमध्ये असते.
2000 मध्ये रिलीज झालेल्या 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या सेटवर शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक यांची ओळख झाली.
चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघे एकमेकांच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर ही मैत्री कायम राहिली.
या चित्रपटानंतर लगेचच 2003 मध्ये 'कुछ ना कहो' या चित्रपटात अभिषेक आणि ऐश्वर्याने एकत्र काम केले.
पुढे या दोघांची मैत्री आणखीणच घट्ट होत गेली. 2006 मध्ये आलेल्या 'उमराव जान' या चित्रपटात हे दोघेंही एकत्र दिसले.
'गुरू' या चित्रपटादरम्यान दोघेंही न्यूयॉर्कमध्ये होते. यावेळी अभिषेकने त्याच्या मनातील भावना ऐश्वर्यापुढे व्यक्त केल्या.
चित्रपटाच्या शूटिंगसाठी दोघेही खूप वेळ एकत्र घालवायचे. दरम्यान अभिषेकने हॉटेलच्या बाल्कनीत ऐश्वर्याला थेट प्रपोज करून लग्न करण्याबद्दल विचारले.
4 जानेवारी 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकचा साखरपुडा झाला. 20 एप्रिल 2007 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांना एक मुलगी आहे. जिचे नाव आराध्या बच्चन आहे. आराध्या आता 16 वर्षांची आहे.