Mishti Doi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा गोड, मलाईदार मिष्टी दोई

Shruti Vilas Kadam

लागणारे साहित्य

1 लिटर फुल फॅट दूध, 1/2 कप साखर, 2 चमचे दही (स्टार्टर), आणि इच्छेनुसार थोडे वेलची पूड घ्या.

Mishti Doi

दूध आटवून घ्या

दूध मंद आचेवर उकळत ठेवा. दूध सुमारे 20 ते 25 टक्के आटेपर्यंत शिजवा. यामुळे मिष्टी दोई अधिक घट्ट आणि मलाईदार बनते.

Mishti Doi

कॅरमेल तयार करा

एका पॅनमध्ये साखर मंद आचेवर वितळवून हलका सोनेरी कॅरमेल तयार करा. हा कॅरमेल दुधात मिसळल्याने मिष्टी दोईला खास रंग आणि चव मिळते.

Mishti Doi Recipe | Saam Tv

दूध थंड होऊ द्या

कॅरमेल मिसळलेले दूध कोमट होईपर्यंत थंड करा. खूप गरम दुधात दही घातल्यास दही व्यवस्थित सेट होत नाही.

Mishti Doi

दही मिसळा

कोमट दुधात 2 चमचे ताजे दही घालून हलक्या हाताने एकजीव करा. हे मिश्रण मातीच्या किंवा काचेच्या भांड्यात ओता.

Mishti Doi Recipe

सेट होण्यासाठी ठेवा

भांडे झाकून 6 ते 8 तास उबदार ठिकाणी ठेवा. दही व्यवस्थित सेट झाल्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवून थंड करा.

Bhapa Doi Recipe

सर्व्ह करण्याची पद्धत

थंडगार मिष्टी दोई ड्रायफ्रूट्स किंवा केशराने सजवून सर्व्ह करा. जेवणानंतरचा हा एक उत्कृष्ट आणि पारंपरिक बंगाली डेझर्ट आहे.

Bhapa Doi Recipe

Dal Makhani Recipe: ढाबास्टाईल डाल मखनी खायची इच्छा होते? मग ट्राय करा ही सोपी रेसिपी

Dal Makhani | yandex
येथे क्लिक करा