Shraddha Thik
1 टीस्पून आले लसूण पेस्ट, 1 कांदा, 2 कप हिरवी मूग डाळ, 2 कप मिश्रित फरसाण, गोडा मसाला, जिरे, चिरलेली कोथिंबीर आणि मीठ.
सर्व प्रथम कढईत तेल गरम करून त्यात कांदा व आले-लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्या.
नंतर टोमॅटो घालून परतून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा.
आता कढईत तेल गरम करून त्यात तयार पेस्ट घाला. यानंतर त्यात मीठ आणि कोरडे मसाले घाला.
यानंतर दुस-या कढईत तेल गरम करून त्यात हिंग, उकडलेले बटाटे, उकडलेले हिरवी मूग डाळ आणि कोरडे मसाले टाकून भाजून घ्या.
यानंतर एका पातेल्यात हलके तेल आणि पावभाजी मसाला घालून पाव दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजवून घ्या.
आता तयार केलेली मिसळ सर्व्हिंग प्लेटमध्ये काढा आणि वर रस्सा घाला. नंतर कांदा आणि हिरवी कोथिंबीर घाला. भाजलेला पाव आणि लिंबाच्या फोडी बरोबर सर्व्ह करा.