Shraddha Thik
राग हा आपल्या मानवाच्या स्वभावाशी निगडीत आहे. कधी-कधी आपल्याला एखादी गोष्टी आवडली नाही, तर आपण चिडचिड किंवा राग करतो.
काही व्यक्तींना खूप राग येतो, मग कारण असो किंवा नसो. जर तुम्हाला खूप राग येत असेल तर हा तुमचा स्वभाव आहे, असा अर्थ होत नाही.
जर तुमच्या शरीरात या जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असेल तर त्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो.
जर तुम्हाला वारंवार राग येत असेल आणि प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर चिडचिड होत असेल तर त्याचा संबंध शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेशी असू शकतो.
शरीरात व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता असल्यास, यामुळे फिल गुड हार्मोन्सची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे व्यक्तीला अधिक राग येऊ शकतो.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा आणि सुस्ती येऊ शकते. त्यामुळे कधी कधी इच्छा नसतानाही तुम्हाला कमीपणा जाणवून चिडचिड होऊ शकते.
शरीरामध्ये झिंकची कमतरता भासल्यासही मूड बदलू शकतो आणि तुमची चिडचिड होऊ शकते. झिंक आपल्या शरीरातील मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे.