Mirchi Bhaji Recipe : रिमझिम पावसात बनवा स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरची भजी, फक्त ५ मिनिटांत रेसिपी तयार

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात काही तरी चटपटीत खावेसे वाटत असेल तर गरमागरमा चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत हिरव्या मिरचीचे भजी बनवा. झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या.

rainy season | yandex

हिरव्या मिरचीचे भजी

हिरव्या मिरचीचे भजी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या, बेसन, गरम मसाला, चाट मसाला, बेकिंग सोडा, लाल तिखट, मीठ, तेल, उकडलेला बटाटा, कांदा इत्यादी साहित्य लागते.

Green Chilli Bhaji | yandex

उकडलेला बटाटा

हिरव्या मिरचीचे भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट, मीठ आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.

Boiled potato | yandex

हिरव्या मिरची

आता मोठ्या हिरव्या मिरचीची एक बाजू तोडून त्यातील बिया काढून टाका. दुसऱ्या बाजूला भजी तळण्यासाठी पॅन गरम करून त्यात तेल ओता.

Green chillies | yandex

बेसन

बाऊलमध्ये बेसन, गरम मसाला, चाट मसाला, मीठ, लाल तिखट, बेकिंग सोडा घाला. पीठ तयार करण्यासाठी हळूहळू पाणी घाला. पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

Besan | yandex

भजी तेलात तळा

आता सर्व मिरच्यांमध्ये बटाट्याचे सारण भरा. भरलेल्या मिरच्या एक-एक करून बेसनात बुडवा आणि हळूहळू गरम तेलात तळून घ्या. मिरच्या हलक्या तपकिरी झाल्यावर काढा.

bhaji | yandex

भजी अन् चटणी

हिरव्या मिरचीचे भजी एका ताटात काढून त्यावर वरून चाट मसाला भुरभुरा. कुरकुरीत हिरव्या मिरचीचे भजी पुदिन्याची चटणी आणि सॉससोबत खा.

Bhaji and chutney | yandex

टीप

भजी तुम्हाला अधिक कुरकुरीत पाहिजे असतील तर पिठात २ चमचे तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लोर मिसळा.

Mirchi Bhaji | pinterest

पावसाळा

पावसाळ्यात काही तरी चटपटीत खावेसे वाटत असेल तर गरमागरमा चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत हिरव्या मिरचीचे भजी बनवा. झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या.

हिरव्या मिरचीचे भजी

Chutney Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...