Shreya Maskar
पावसाळ्यात जेवताना तोंडी लावण्यासाठी खास चटपटीत दोडक्याची चटणी बनवा. झटपट होणारी रेसिपी आताच नोट करा.
दोडक्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर दोडका, टोमॅटो आणि लसणाच्या पाकळ्या भाजून घ्या. दोडका भाजायला सोपा जावा म्हणून तो थोडा जाडसर निवडा.
तु्म्हाला हे पदार्थ भाजायचे नसतील तर दोडका, टोमॅटो आणि लसूण हलके उकडून घेऊ शकता.
सर्व पदार्थ भाजून झाल्यावर ते थंड होऊ द्या, नंतर टोमॅटो आणि दोडक्याची साल काढा. तसेच, लसणाच्या पाकळ्या काढून त्यांची साल काढा.
आता पाटावर हिरव्या मिरच्या, ताजी कोथिंबीर, अख्ख्या सुक्या लाल मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि मीठ वाटून घ्या. नंतर त्यात टोमॅटो आणि दोडका घालून सर्वकाही व्यवस्थित वाटून घ्या.
तुम्हाला पाटा वरवंट्यावर चटणी बनवायची नसेल तर तुम्ही हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता. यात जास्तीचे पाणी घालणे टाळा.
चटणी तयार झाल्यावर तुम्ही त्यात थोडा लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घ्या. चटणी जास्त आंबट होणार नाही याची काळजी घ्या.
चटपटीत दोडक्याची चटणी भात, गरमागरम भाकरी, चपाती, पराठा, रोटी यांच्यासोबत खा. भाजीपेक्षा तिची चव खूप वेगळी आणि स्वादिष्ट असते.